Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

ताणमुक्त जीवन हीच यशस्वी, आनंदी, आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली:-डॉ. एम.जी. जाधव

 ताणमुक्त जीवन हीच यशस्वी, आनंदी, आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली:-डॉ. एम.जी. जाधव

 कराड - प्रतिनिधी.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे, मानसशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. एम. जी. जाधव होते. उत्तम मानसिक आरोग्यासाठी ताण व्यवस्थापन या विषयावर बोलताना आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, ताणमुक्त जीवन हीच यशस्वी आनंदी आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. कोणतीही व्यक्ती शारीरिक, मानसिक व सामाजिक पातळीवर व्यवस्थित कार्य करत असेल तरच त्याचे आरोग्य चांगले आहे असे म्हणता येते. शरीर, मन व समाज याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आनंदी असणे म्हणजे मानसिक आरोग्य चांगले आहे असे म्हणतात. माणूस आपल्या भोवती स्वतः ताण निर्माण करतो. तो कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक इत्यादी माध्यमातून निर्माण होतो. ताण व आरोग्य यांचा जवळचा संबंध असून ताणाचे नियंत्रण आवश्यक आहे. वाढलेला ताण कमी करण्यासाठी ताण कमी करण्याचे नियोजन आवश्यक आहे. यासाठी प्रश्नांना सामोरे जाणे व आहार व्यायाम यावरती भर देणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचारांची जपणूक करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्यासाठी ताण व्यवस्थापन करणे काळाची गरज बनली आहे.

                           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.सतीश घाटगे होते.. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, ताण घ्यायचा का नाही? हे आपले मनच ठरवते. स्त्री व पुरुषांचा विचार करतात महिला ह्या मानसिक दृष्ट्या खंबीर असतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण कमी दिसते. म्हणून प्रत्येकाने मानसिक दृष्ट्या सुदृढ असते महत्त्वाचे आहे. ताणावरती नियंत्रण मिळवून आपले आरोग्य जपणे ही आज प्रत्येक व्यक्तीची गरज बनलेली आहे.

                  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सोमनाथ पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.अरविंद मोहिते यांनी केला. तर सूत्रसंचालन व आभार डॉक्टर स्वाती मोरकळ यांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व प्राध्यापक बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments