Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १५० येथे पक्षाच्या नामफलकाचे अनावरण


बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १५० येथे पक्षाच्या नामफलकाचे अनावरण

 मुंबई - प्रतिनिधी.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त चेंबूर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १५० येथे पक्षाच्या नामफलकाचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.या नामफलकाचे अनावरण बौद्धाचार्य बापूसाहेब चंदनशिवे, पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजाराम आढाव आणि स्थानिक ज्येष्ठ नागरिक केदारे साहेब यांच्या हस्ते रिबीन कापून तसेच बी.आर.एस.पी ऑक्टोबर महिना विशेषांक चे वाटप करून करण्यात आले.या कार्यक्रमाला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष दिपक चौगुले, चेंबूर विधानसभा अध्यक्ष सतेश मस्के, चेंबूर विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत आढाव, सुशांत आढाव, गणेश माने, विभागातील युवा धम्म प्रचारक अभिजीत कांबळे तसेच स्थानिक सहकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.मान्यवर कांशीराम साहेब यांनी बहुजन समाजाला राजकीयदृष्ट्या जागृत करून संघटित करण्यासाठी केलेल्या कार्याचे स्मरण यावेळी करण्यात आले. त्यांच्या विचारांना अभिप्रेत असलेली सामाजिक समता, बंधुता आणि बहुजन समाजाचे राजकीय सक्षमीकरण ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.बहुजन समाजाच्या हक्कांसाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.




Post a Comment

0 Comments