राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये महिलांसाठी सायबर सुरक्षा व सायबर गुन्हेगारी प्रतिबंधावर मार्गदर्शन.
कासेगाव - प्रतिनिधी.
कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव येथे दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता अंतर्गत तक्रार समिती (Internal Complaints Committee) व महिला विकास समिती (Women Development Committee) यांच्या संयुक्त विद्यमाने “महिलांसाठी सायबर सुरक्षा, ऑनलाइन छळास प्रतिबंध व सायबर गुन्हेगारी” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्री. संपत वारके, ईश्वरपूर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांच्या सायबर सुरक्षेबाबत सविस्तर माहिती देताना ऑनलाइन छळ, सोशल मीडियावरील गैरवापर, सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, वैयक्तिक माहितीची सुरक्षितता तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच सायबर गुन्हा घडल्यास तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, १९३० हेल्पलाईन व कायदेशीर उपाययोजनांबाबतही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. मोहिते, डॉ. जी. एच. वाडकर, अंतर्गत तक्रार आणि महिला विकास समितीच्या डॉ. श्रीमती आय. एस. बंडगर, श्रीमती व्ही. एम. वाटेगावकर, श्रीमती ए. पी. कोरे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल सुजाता माळी व पोलीस कॉन्स्टेबल कोमल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर.डी .सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. एस. बी. पाटील, श्रीमती एस. जे. कांबळे, श्रीमती ए. एस. शेवाळे, श्रीमती व्ही. आर. गावडे, श्री. एस. टी. गुरव, श्री. यू. आर. पाटील, श्री. ए .डी डंगारणे, श्री. ए .एस. जाधव व श्री. बाबा गंगनमाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Post a Comment
0 Comments