शेटफळ येथील बौद्ध समाजावरील प्राणघातक हल्ला प्रकरण; २५ जणांना अटक, मुख्य आरोपी अद्याप फरार !
मुख्य आरोपीला तातडीने अटक करा; भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांची मागणी
सोलापूर - प्रतिनिधी.
शेटफळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर : शेटफळ येथे बौद्ध समाजातील व्यक्तींवर झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात २५ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मुख्य आरोपीला तातडीने अटक करून या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केली आहे.कांबळे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी तपासाला गती द्यावी, फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला त्वरित अटक करावी आणि पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका मांडली आहे. केवळ इतर आरोपींना अटक करून चालणार नाही, तर या घटनेतील मुख्य आरोपीलाही कायद्याच्या कक्षेत आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


Post a Comment
0 Comments