Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

व्यसनमुक्त पी. एल. लोखंडे मार्गासाठी BRSP चे टिळक नगर पोलिसांना निवेदन.

 व्यसनमुक्त पी. एल. लोखंडे मार्गासाठी BRSP चे टिळक नगर पोलिसांना निवेदन.

मुंबई : प्रतिनिधी.

पी. एल. लोखंडे मार्ग व टिळक नगर पोलीस ठाणे हद्दीतील अमली पदार्थ, अवैध मद्यविक्री व सार्वजनिक मद्यपानाला आळा घालण्यासाठी BRSP पी. एल. लोखंडे मार्ग युनिटच्या वतीने टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष डेंबरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.परिसरात विशेष पोलीस गस्त, अमली पदार्थ व अवैध मद्यविक्रीविरोधात, मटका , जुगार यावर कारवाई, शाळा-महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्या पानटपरी बंद व्हाव्या तसेच विभागात जनजागृती तसेच “व्यसनमुक्त पी. एल. लोखंडे मार्ग व ड्रग्स फ्री मुंबई” तसेच इतर अभियान प्रभावीपणे राबविण्याची मागणी करण्यात आली.यावेळी मुंबई प्रदेश अध्यक्ष दिपक मंगेश चौगुले, चेंबूर विधानसभा अध्यक्ष सतेश मस्के, प्रशांत आढाव, अभिजित कांबळे तसेच इतर सहकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments