Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील सकारात्मक परिवर्तनाचे प्रमुख साधन म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना:-डॉ. संदीप लोखंडे

 विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील सकारात्मक परिवर्तनाचे प्रमुख साधन म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना:-डॉ. संदीप लोखंडे

 कराड - प्रतिनिधी.

  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक डॉ. संदीप लोखंडे वाणिज्य विभाग प्रमुख, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे हे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील सकारात्मक परिवर्तनाचे प्रमुख साधन म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. महाविद्यालयीन विद्यार्थी पुस्तकी ज्ञानाबरोबर श्रम संस्काराचे धडे एनएसएसच्या माध्यमातून गिरवतात. ज्ञानात्मक, भावात्मक व क्रियात्मक अशा तिन्ही पातळीवरती या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी व्यक्तिमत्व तयार होते. श्रम संस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासास गती मिळते. ग्रामसफाई, वृक्षारोपण, साक्षरता, विविध प्रबोधन पर कार्यक्रम, वनराई बंधारे असे विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळे विद्यार्थी जीवनातच सर्वांगीण बाबीचे ज्ञान मिळाल्याने विद्यार्थी अष्टपैलू बनतो. त्याच्यामध्ये राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होते. कोरोना सारखी रोगराई असेल किंवा महापुरासारखी आपत्ती असेल अशा नैसर्गिक व मानवी आपत्तीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाचा आधार असते. आज देशासमोर अनेक पर्यावरणीय समस्या आहेत. त्या सोडवताना शाश्वत विकासाची संकल्पना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबवता येईल. आज राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो!

                  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले 'नॉट मी बट यु' मी माझ्यासाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी आहे. हा महान विचार राष्ट्रीय सेवा योजना देते. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यात सेवाभावी वृत्ती वाढते. राष्ट्रीय सेवा योजनेतून अनेक महान व्यक्तीमत्वे घडलेली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेत वाढलेला विद्यार्थी हा या देशाचा एक सुजाण नागरिक बनत असतो. त्यामुळेच राष्ट्र विकासात देखील मदत होते.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. रघुनाथ गवळी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कार्यक्रम अधिकारी डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी दळे यांनी केले. आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. अण्णासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या नियोजनात प्राध्यापक विश्वनाथ सुतार, प्रा. जयदीप चव्हाण, प्रा. युवराज कापसे, प्रा. दिपाली वाघमारे, प्रा. संदीप तुपे,प्रा.विनायक जाधव, प्रा.लक्ष्मी जाधव यांचे, श्री प्रकाश पाटील व श्री पंकज कुंभार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments