बुवा विष्णू कोकाटे यांची अप्रतिम भजन सेवा वयाच्या ९६ व्या वर्षीही हरीनामाचा गजर.
मुंबई - प्रतिनिधी.
"हरीनाम ज्याच्या मुखी, तो सदा सुखी..." या उक्तीचा ध्यास घेत, वयाच्या ९६ व्या वर्षीही हरीनामाची अखंड गोडी जपणारे राजापूर तालुक्यातील बांदिवडे गावचे 'भजन सम्राट' बुवा विष्णू पुंडलिक कोकाटे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.'श्री भराडी देवी प्रसादिक भजन मंडळ'च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावातून आलेले बुवा विष्णू कोकाटे, या वयातही आपल्या अप्रतिम आणि तल्लीन करणाऱ्या भजन सेवेने रसिक श्रोत्यांना भुरळ घालत आहेत. वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरही त्यांच्या मुखातील हरीनामाची ओढ आणि भजनातील सुरेलपणा कमी झालेला नाही. निष्ठा आणि समर्पित वारकरी सेवा संपूर्ण कोकणात कौतुकाचा विषय ठरली आहे.


Post a Comment
0 Comments