इंग्रुळ येथे भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिन साजरा.
शिराळा - प्रतिनिधी.
इंग्रुळ, ता. शिराळा भारतीय बौद्ध महासभा शाखा शिराळा तर्फे दि. १७ सप्टेंबर रोजी इंग्रुळ येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४९ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून त्रिशरण व पंचशील पठण केले. सूत्रसंचालन बौद्धाचार्य दीपक कांबळे यांनी केले. यावेळी तालुका अध्यक्ष बौद्धाचार्य शशिकांत कांबळे यांनी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट सांगितला, तर ॲड. महेंद्र झाडे यांनी संघर्ष मांडला. बौद्धाचार्य जगन्नाथ परुले यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी तालुका सरचिटणीस अमोल झाडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन जालिंदर कांबळे यांनी केले होते. महेश कांबळे यांनी उपस्थितांची अल्पोपहाराची व्यवस्था केली होती . यावेळी रमाकांत मोहिते, अशोक कांबळे, जगन्नाथ झाडे, सुभाष दळवी, सुरेश कांबळे, जालिंदर रंगराव कांबळे, शिवाजी कांबळे, राज कांबळे, श्रेया कांबळे, अर्चना कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरणत्तय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.


Post a Comment
0 Comments