क्रीडा स्पर्धेत मिळणाऱ्या संधीचं सोन करणारे खेळाडू यशाचे शिखर पार करतात ; प्राचार्य दिलीप संकपाळ
कराड - प्रतिनिधी.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सातारा विभागीय बेसबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक मा. प्राचार्य दिलीप संकपाळ होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले क्रीडा स्पर्धेत मिळणाऱ्या संधीचं सोनं करणारे खेळाडू यशाचे शिखर पार करतात. बेसबॉल हा जगातला सगळ्यात शिस्तीचा खेळ मांडला जातो. स्पर्धात्मक युगात खेळाडूंनी खिलाडू वृत्ती जोपासली पाहिजे. कोल्हापूरच्या कुस्तीची शिस्त आणि सातारच्या मातीची जिद्द या दोन्हींचा संगम म्हणजे बेसबॉल होय. बेसबॉल मध्ये कोणीही एकटा हिरो होऊ शकत नाही कितीही मोठा फटका मारला तरी बेसवर पोहोचवायला टीम लागते. त्यामुळे आयुष्यात मी नाही तर आपण सर्वजण हा विचार महत्त्वाचा आहे. लढताना अपयश आले तरी निराश होऊ नये स्वर्गीय पी. डी. पाटील क्रीडा नगरीतून अनेक खेळाडू घडले. आजच्या या बेसबॉल स्पर्धेतून देखील एखादा ऑलम्पिक वीर नक्की घडेल.अशी अशा व्यक्त करतो आणि या स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करतो!
स्पर्धेच्या या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि वेणूताई चव्हाण महाविद्यालय यांच्या सहकार्यातून आमच्या महाविद्यालयाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सातारा विभागीय बेसबॉल स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो.
या स्पर्धेसाठी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स चे प्राचार्य डॉ.शिवाजी बुरुंगले, वेणूताई चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभागीय क्रीडा परिषद सचिव डॉ. शिवराज गायकवाड, डॉ.दीपक डांगे- पाटील, प्रा. डाफळे सर, प्रा.अमरसिंह सावंत, प्रा. दिग्विजय पाटील, प्रा. अमित पोळ,, डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. रत्नाकर कोळी, प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा. दिपक गुरव, प्रा. संदीप तुपे, प्रा. खवळे मॅडम, प्रा.युवराज कापसे, प्रा. जयदीप चव्हाण, श्री. पंकज कुंभार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.सुभाष कांबळे यांनी केला तर आभार स्पर्धेचे समन्वयक जिमखाना विभाग प्रमुख डॉ.लक्ष्मण दोडमणी यांनी व्यक्त केले. सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे बेसबॉल संघ उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments