राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत घोगावच्या विद्यार्थिनींचे यश
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म), घोगाव या महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी धनश्री नाईक व अनिसा मुल्ला यांनी ऑल फार्मसी टेक्निकल इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून बारामती कॉलेज ऑफ फार्मसी, बारामती येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. त्यांनी विषय टेली फार्मसी ग्रामीण आरोग्य सेवा आणि वैयक्तिकृत वैद्यकीय उपचार यांना जोडणारा दुवा या विषयावर प्रभावी पोस्टर सादरीकरण केले. यावेळी त्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व प्रा. मोनिका शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसुन जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.


Post a Comment
0 Comments