संवाद, सकारात्मक विचार आणि मानसिक आरोग्याची जपणूक हीच आत्महत्या प्रतिबंधाची गुरुकिल्ली ___प्रो.डॉ.सतीश घाटगे
कराड - प्रतिनिधी.
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे मानसशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, संवाद, सकारात्मक विचार आणि मानसिक आरोग्याची जपणूक हीच आत्महत्या प्रतिबंधाची गुरुकिल्ली आहे. संकटाच्या काळात व्यक्तीशी सुसंवाद करून त्याच्यातील नकारात्मकता दूर करणे आवश्यक आहे. भावनिक पाठबळाच्या आधारे अडचणीतील व्यक्तीचे मनोबल वाढवून त्याच्यात सकारात्मक विचारांचे बीजारोपण करणे आवश्यक आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरील उपाय नाही याबाबत आज जनजागृतीची गरज आहे. समाजातील कुटुंबातील व्यक्तीचे वर्तन समजून घेता आले तर आत्महत्या सारख्या समस्या आपण टाळू शकतो. या कार्यक्रमात आत्महत्या संदर्भात विद्यार्थी व शिक्षक यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मार्गदर्शकांनी दिली. या समस्येविषयी संवाद साधण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सोमनाथ पाटील यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी वाढता मानसिक ताण, एकटेपणा, नैराश्य, कौटुंबिक व सामाजिक समस्या यासारख्या परिस्थितीत व्यक्तीने संवाद साधने आणि योग्य वेळी मदत घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाच्या वतीने भित्ती पत्रिकेचे उद्घाटन माननीय प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे सर यांच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वाती मोरकळ यांनी केले आभार प्रा. तेजस्विनी दळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रा. विश्वनाथ सुतार, डॉ. सुभाष कांबळे, प्रा. जयदीप चव्हाण, डॉ. अभिजीत दळवी, प्रा. दिपाली वाघमारे, प्रा. शैला चौबे, डॉ. दादासाहेब घाडगे, सीनियर व ज्युनिअर विभागातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments