Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

साळशिरंबे विकास सेवा सोसायटीची अमृत महोत्सवी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न .

 साळशिरंबे विकास सेवा सोसायटीची अमृत महोत्सवी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न .

 सभासदांना दहा टक्के डिव्हिडंट ;75 वर्षातील चेअरमन यांचा गौरव

उंडाळे -  प्रतिनिधी.

साळशिरंबे तालुका कराड येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची 75 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब लोखंडे होते.यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम पाटील, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष पंकज पाटील, माजी सरपंच तसेच विद्यमान सदस्य तात्यासो पाटील,माजी चेअरमन उत्तम पाटील, काका पाटील ,माजी ग्रामपंचायत सदस्य शकुर मुल्ला, माजी चेअरमन हिंदूराव पाटील, माजी चेअरमन दादू जाधव, सरपंच प्रमिला कुंभार, उपसरपंच अभिजित चवरे, इंजि.मिलिंद पाटील, मानसिंग पाटील, जालिंदर देशमुख व सभासद तसेच सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेचे माजी चेअरमन व मार्गदर्शनक संचालक-धनाजी पाटील  यांनी संस्थेची स्थापना 1951 साली झाल्या पासून आज पर्यंतच्या 75 वर्षाच्या कार्याचा आढावा सभासदांच्या पुढे मांडला, तसेच 75 वर्षात जे चेअरमन होऊन गेले त्या सर्वांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला,अहवाल सालातील ताळेबंद पत्रक व  नफा तोटा वाटणी सभासद समोर मांडून सभासदांना दहा टक्के डिव्हिडंड वाटप करण्याचेही त्यांनी जाहीर केले,संस्थेचे सभासद प्रदीप रवलेकर यांना सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाचा रवींद्र पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल दोघांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे सचिव विकास कणसे यांनी केले तर सभासदांच्या प्रश्नांना संचालक मंडळाने उत्तरे दिली आभार  रमेश पाटील यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments