Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कराड तालुका कागदावरच दुष्काळमुक्त प्रत्यक्षात होरपळतोय !

 कराड तालुका कागदावरच दुष्काळमुक्त प्रत्यक्षात होरपळतोय !

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :- 

महाराष्ट्र शासनाने २६ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु या यादीत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याचा समावेश का नाही? त्यामुळे स्थानिक पातळीवर आणि शेतकरी वर्गातून शासकीय सर्वेक्षणावर आणि निकषांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर येत आहे.केंद्र व राज्य सरकारच्या २०१६ च्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार, २५ टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची तूट आणि सलग २१ दिवसांचा पावसाचा खंड असणाऱ्या तालुक्यांमध्येच दुष्काळ व्यवस्थापनाच्या शास्त्रीय निकषानुसार घोषित केला जाणारा पहिला टप्पा लागू केला (ट्रिगर-१') त्यातील कागदोपत्री आकडेवारीनुसार कराड तालुका या निकषात न बसल्याचे सांगण्यात येत असले तरी स्थानिक परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरीवर्गातून होत आहे.कराड तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीन, भुईमुग, चवळी, मूग, उडीद आदी खरीप त्याबरोबर ऊस या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी खालावली असून अनेक गावांमध्ये पाणीटंचाई भासत आहे. असे असतानाही केवळ 'कागदोपत्री निकष' पूर्ण न झाल्याने तालुका दुष्काळमुक्त दाखवल्याने शेतकरी संतप्त आहेत.दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी जाहीर झालेल्या जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत आणि विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफी यांसारख्या १२ मोठ्या सवलतींचा लाभ आता कराडमधील शेतकऱ्यांना मिळणार का? त्यामुळे सर्वेक्षणाच्या अचूकतेवर प्रश्न चिन्ह केला जात आहेत.शासनाने पहिल्या टप्प्यात २६५ तालुक्यांची यादी जाहीर केली असली, तरी उर्वरित ९३ तालुक्यांमधील परिस्थितीबाबत स्थानिक महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात येणारे सर्वेक्षण कोणत्या आधारे केले जाणार याकडे संपून भयभीत शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांकडून कराड तालुक्याचा समावेश करण्यासाठी सरकारवर दबाव आणला जाईल का ? याकडे कराड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Post a Comment

0 Comments