Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत तत्पर बँकिंग सेवा देणे हे कोयना बँकेचे उद्दिष्ट___ डॉ. सुरेशबाबा भोसले.


  ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत तत्पर बँकिंग सेवा देणे हे कोयना बँकेचे उद्दिष्ट___ डॉ. सुरेशबाबा भोसले.

कोयना सहकारी बँक उंब्रज शाखेचा स्थलांतर सोहळा संपन्न.

कराड :- प्रतिनिधी.

कोयना सहकारी बँक लि; कराडच्या उंब्रज शाखेचा स्थलांतर सोहळा शेती उत्पन्न बाजार समिती परिसर, उंब्रज येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत तत्पर बँकिंग सेवा पोहोचवणे हे कोयना बँकेचे उद्दिष्ट नेहमीच कौतुकास्पद राहिले आहे. नवीन जागेत स्थलांतरित झालेली ही शाखा उंब्रज परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर आणि गतिमान सेवा देईल, असा ठाम विश्वास आहे असं  मत य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी व्यक्त केलं .या कार्यक्रम प्रसंगी  कराड उत्तरचे आमदार श्री. मनोज घोरपडे, विधानपरिषदेचे आमदार श्री. धैर्यशील कदम, य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले,बँकेचे संस्थापक  ॲड. उदयसिंह पाटील, अदिराज पाटील तसेच बँकेचे अध्यक्ष श्री. कृष्णत पाटील, उपाध्यक्ष श्री. साहेबराव शेवाळे, संचालक मंडळ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments