शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय बेसबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.
कराड - प्रतिनिधी.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड यांचे वतीने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सातारा विभागीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या संपन्न झाले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. शिवराज गायकवाड शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सातारा विभागीय क्रीडा परिषदेचे सचिव होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, आज ज्या बेसबॉल संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला त्या सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो! कारण आजही हा खेळ मोठ्या प्रमाणात आपल्या विद्यापीठीय क्षेत्रात प्रचलित झालेला नाही. आपल्या सहभागाने हा खेळ सर्वत्र प्रचलित होण्यास मदत होईल. कोणत्याही स्पर्धेत स्पर्धा ही दुसऱ्याशी नसून मी पहिल्यापेक्षा आणखी किती तयार झालो यासाठी असते. खेळ असतो त्या ठिकाणी हार जीत असते. प्रत्येक वेळेला जिंकणेच महत्त्वाचे नसून त्यातील सहभाग देखी महत्त्वाचा ठरतो.ज्या संघानी ही स्पर्धा जिंकली त्या सर्वांचे मी अभिनंदन ही करतो!स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. या स्पर्धेसाठी वेणूताई चव्हाण महाविद्यालय कराड व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स यांनी क्रीडांगणाची उपलब्धता करून सहकार्य केले. या सातारा विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स या संघाचा आला. द्वितीय क्रमांक बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण यांचा आला व तृतीय क्रमांक सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड या संघाचा आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुभाष कांबळे यांनी केले आभार स्पर्धा समन्वयक डॉ. लक्ष्मण दोडमणी यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप तुपे यांनी केले श्री पंकज कुंभार यांचेही सहकार्य लाभले. या पारितोषिक वितरण सोहळ्यास डॉ.दीपक डांगे- पाटील, प्रा. विलास डाफळे , प्रा.अमरसिंह सावंत, प्रा. दिग्विजय पाटील, प्रा. अमित पोळ,, डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. रत्नाकर कोळी, प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा. दिपक गुरव, प्रा. खवळे मॅडम, प्रा.युवराज कापसे, उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments