बांदीवडे येथे रंगला हरिभजनाचा अन् ढोल-ताशांचा गजर.
पंडित कोकाटे यांच्या घरी भक्तिमय वातावरण !
राजापूर - प्रतिनिधी.
राजापूर तालुक्यातील बांदीवडे गावचे उद्योगपती व भजनी बुवा श्री. पंडित तुकाराम कोकाटे यांच्या घरी गणेशोत्सव अत्यंत उत्साहात, भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला . या दिवसांत बांदीवडे व पंचक्रोशीतील नावाजलेल्या भजनी बुवांची भजनसेवा आणि ढोल-ताशांचा गजर श्री. गणेशाच्या चरणी अर्पित करण्यात आला.श्री. पंडित कोकाटे यांच्या घरच्या गणेश उत्सव प्रसंगी परिसरातील विविध भजनी मंडळांनी आणि नामवंत बुवांनी आपली अप्रतिम भजनरुपी सेवा सादर केली .यावेळी श्री. जय गणेश प्रासादिक भजन मंडळ, उपळे (नवलुवाडी) बुवा श्री. श्रृणाल अंकुश नवलु यांच्या सुरेल भजनाने उपस्थितांची मने जिंकली.श्री. निनादेवी प्रासादिक भजन मंडळ, जुवटी बुवा श्री. दीपक (बाबू) जुवाटकर (गाव जुवटी) आणि बुवा श्री. भाऊ घाडी (गाव उपळे) यांनी आपल्या रंगतदार भजनाने उपस्थितांना डोलवायला लावले.
श्री. महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ (प्रिंदावन/उपळे) बुवा श्री. सुरेश दळवी, बुवा मधू दळवी, पखवाज वादक सागर तिलोटकर (गाव प्रिंदावन ) व बुवा श्री. महेंद्र गुरव (उपळे) यांच्या साथीने भजनाची बहारदार सेवा सादर झाली. महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ व ढोल पथक बुवा कुमारी मंजिरी महेंद्र गुरव हिच्या अप्रतिम भजनाने व सोबतच ढोल पथकाच्या दणदणाटाने वातावरणात मोठा उत्साह भरला. भजन सम्राट बुवा मनोहर पांडुरंग कोकाटे भजन क्षेत्रातील दिग्गज भजन सम्राट बुवा मनोहर कोकाटे यांच्या उपस्थितीने आणि सुरेल गायकीने कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली.
या सोहळ्यात उद्योजक व भजनी बुवा श्री. पंडित तुकाराम कोकाटे (गाव बांदीवडे) यांनी स्वतः तसेच पंचक्रोशीतील सर्व मान्यवर भजनी बुवांनी मनोभावे आणि निष्ठेने श्री गणेशाच्या चरणी हरिभजनाची सेवा अर्पण केली.
गणपती बाप्पाच्या आरतीने, ढोल-ताशांच्या गजराने आणि भजनाच्या तालावर संपूर्ण बांदीवडे पंचक्रोशी आनंदून गेली होती . "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !" च्या जयघोषात आणि भावूक वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला.


Post a Comment
0 Comments