घरगुती गणपती आणि गौराईचे विसर्जन.
उंडाळे: प्रतिनिधी.
उंडाळे परिसरात सकाळपासूनच घराघरांमध्ये बाप्पाची आणि गौरीची उत्तरपूजा, आरती आणि विशेष नैवेद्य अर्पण करून विसर्जनाची तयारी सुरू होती."गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या" च्या जयघोषात घरगुती गणपती आणि गौराईला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणेशोत्सवाच्या धामधुमीत लाडक्या घरगुती गणपती बाप्पाचे आणि गौरींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात येत आहे. मागील काही दिवस घराघरांमध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण केल्यानंतर, मुखात 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष करत भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.


Post a Comment
0 Comments