Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कराड येथे दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘निःशुल्क साहित्य वाटप शिबिर’

कराड येथे दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘निःशुल्क साहित्य वाटप शिबिर’ 

कराड - प्रतिनिधी.

 पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय (भारत सरकार) यांच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत कराड येथे दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘निःशुल्क साहित्य वाटप शिबिर’ यशस्वीरीत्या कराड दक्षिणचे  आश्वासक आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.या शिबिरात एकूण ९२१ पात्र लाभार्थ्यांना तब्बल ८०.७८ लाख रुपयांच्या आधुनिक सहायक साधनांचे व साहित्याचे वितरण करण्यात आले. गरजूंच्या आयुष्यातील अडचणी काही प्रमाणात कमी व्हाव्यात, त्यांच्या दैनंदिन जीवनाला आधार मिळावा आणि त्यांना अधिक स्वावलंबीपणे जगता यावे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.‘सेवा हीच साधना’ या भावनेतून समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा सेवाभावी विचार मा. मोदीजींच्या कार्यातून सातत्याने दिसून येतो. 

या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये राबविण्यात आलेला हा उपक्रम म्हणजे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणारी सेवाभावी मानवतेची जाणीव आहे.दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात देत त्यांच्या जीवनात आत्मविश्वास, सन्मान आणि स्वावलंबनाची नवी उमेद निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.

 

डॉ. अतुलबाबा भोसले आमदार कराड दक्षिण.


Post a Comment

0 Comments