Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात 'जागतिक ओझोन दिन' संपन्न.

 शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात 'जागतिक ओझोन दिन' संपन्न.

कराड - प्रतिनिधी.

पर्यावरण संवर्धनाबाबत आणि ओझोन थराच्या संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात 'जागतिक ओझोन दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले.यावेळी ओझोन थराचे महत्त्व, क्षयाची कारणे आणि उपायांवर आधारित विशेष भित्तीपत्रिकेचे अनावरण प्रा. अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ही  भित्तीपत्रिका महाविद्यालयाच्या कु. श्रावणी जाधव व कु. रिद्धी केंगार या विद्यार्थिनींनी तयार केली होती.याचबरोबर  ओझोनच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकणारे आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे सादरीकरण पीपीटी (PPT) आणि व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितांसमोर सादर करण्यात आले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक  प्रा. अभिजीत कदम यांनी केलं.  कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्रा. मनाली रानडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. जीवनलाल अंबुडरे यांनी मानले.या  कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments