Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कासेगांव शिक्षण संस्थेचे'आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतीस विनम्र अभिवाद.

 कासेगांव शिक्षण संस्थेचे'आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतीस विनम्र अभिवाद.

कासेगाव: प्रतिनिधी.

भारतीय हॉकीचे जादूगार, भारतरत्न पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, कासेगांव येथे 'राष्ट्रीय क्रीडा दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुहास वगरे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनप्रवासाचा आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचा वेध घेतला. "आजच्या तरुण पिढीने अभ्यासासोबतच दैनंदिन जीवनात शारीरिक सुदृढतेलाही प्राधान्य द्यावे," असे मत त्यांनी व्यक्त केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मगदूम म्हणाले की, "क्रीडा प्रकार केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त, सहकार्य आणि आत्मविश्वास निर्माण करतात. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील क्रीडा सुविधांचा पूर्ण वापर करून विविध पातळ्यांवर आपले कौशल्य सिद्ध करावे."या औचित्यावर महाविद्यालयातील गुणवंत खेळाडूंचा प्राचार्य डॉ. एस. एम. मगदूम यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. बी. के. माने,प्रशासकीय सेवक श्री. अरुण भोई, श्री. अमोल पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय सेवक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments