श्री. सर्जेराव देसाई यांची भाजप दिव्यांग आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; जंगी सत्कार सोहळ्यातून शुभेच्छांचा वर्षाव !
उंडाळे :- प्रतिनिधी.
भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी टाळगाव येथील श्री. सर्जेराव देसाई यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजपच्या ज्येष्ठ व जुन्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार कराड शासकीय सर्किट हाऊस येथे आला.
देसाई यांच्या सामाजिक कार्याची, पक्षनिष्ठेची आणि संघटनात्मक योगदानाची दखल घेत त्यांच्यावर जिल्हास्तरीय महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे टाळगावसह परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी श्री. देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडून त्यांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी काम करण्याचा संकल्प श्री. देसाई यांच्या माध्यमातून अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत दिव्यांग बांधवांच्या अडचणी शासन दरबारी पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी भावना श्री. सर्जेराव देसाई यांनी व्यक्त केली.या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “सर्जेराव देसाई यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन!” अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.


Post a Comment
0 Comments