माझी शाळा आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांना गती द्या !
गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-
‘माझी शाळा, आदर्श शाळा’ आणि ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामांचा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला.या बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.प्राथमिक शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या दोन्ही क्षेत्रांत सातारा जिल्हा राज्यात अव्वल राहावा, यासाठी सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करून डिसेंबरअखेर कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.आदर्श शाळा व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे सौर ऊर्जेवर कार्यरत करण्यासह, कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सातारा जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही वचन यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज यांनी दिले !


Post a Comment
0 Comments