शंकर शेवाळे यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण सामाजिक पुरस्कार जाहीर.
कासेगाव - प्रतिनिधी.
कराड (प्रतिनिधी) येवती गावचे सुपुत्र शिवतेज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, मुंबई ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर यशवंत शेवाळे (बापू ) यांना यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबईचा ' यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार 2026 जाहीर झाला असल्याची माहिती, यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष संजय सावंत यांनी दिली, हा दिमाखदार पुरस्कार सोहळा 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वा. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन वाशी, या ठिकाणी आ. चित्राताई वाघ, सदस्य, विधान परिषद महाराष्ट्र शासन, नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे, या पुरस्कार सोहळ्यास ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, नवी मुंबईच्या नगरसेविका नेत्रा शिर्के, धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप, दैनिक ललकारचे कराड कार्यालय प्रमुख ज्ञानेश्वर शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, शिवतेज सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे सर्व सदस्य, संत ज्ञानेश्वर माऊली प्रसादिक वारकरी भजन मंडळ ठाणे, येवती ग्रामस्थ, ठाणे येथील शंकर शेवाळे यांचा मित्रपरिवार, ठाण्यातील नगरसेवक, आदींनी शंकर शेवाळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या


Post a Comment
0 Comments