Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ व शिष्य परिवारातर्फे ऐरोलीत 'गुरुवंदना २०२६' सोहळ्याचे शानदार आयोजन.


श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ व शिष्य परिवारातर्फे ऐरोलीत 'गुरुवंदना २०२६' सोहळ्याचे शानदार आयोजन.

मुंबई - प्रतिनिधी.

श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ, ऐरोली-नवी मुंबई आणि बुवा श्री समीर गावडे शिष्य परिवार यांनी  रविवार दिनांक 09/08/2026 रोजी  "गुरुवंदना 2026" हा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम ऐरोली सेक्टर-15 येथील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला शाल व हार घालून वंदन करण्यात आले. हे सर्व गुरुवर्य बुवा श्री समीर गावडे, श्री जयवंत पाटील, श्री चंद्रकांत देसाई यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.त्यानंतर शिष्यगणांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रथम बुवा श्री राजेंद्र देसाई यांनी प्रार्थना, भजन, रूपावली, गजर आणि अभंग घेऊन अप्रतिम सुरुवात केली. त्यानंतर बुवा श्री अर्चित चव्हाण, बुवा श्री संदिप काळे, बुवा श्री सुशांत सावंत, बुवा श्री उदय गोसावी, बुवा कु रजत गवस, बुवा श्री अर्जुन पालयेकर, बुवा कु ललित घाडी ह्या सर्व शिष्यांनी आपले अभंग सादरीकरण केले.ह्या कार्यक्रमासाठी ऐरोलीतील नामवंत कार्यसम्राट नगरसेवक श्री मामित भाई चौगुले आवर्जून उपस्थित होते व त्यांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले.तसेच सिंधुदुर्ग रहिवाशी सेवा संघ, मुलुंड यांचे अध्यक्ष श्री दत्ताराम परब सुद्धा उपस्थित होते.त्यानंतर सर्व शिष्यांनी मिळून आपल्या गुरूंचे पाद्यपूजन करून त्यांना वंदन  करून त्यांचे आशीर्वाद घेतले.त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी आपले अभंग सादरीकरण केले.ह्यात बुवा श्री रमेश पराडकर, बुवा श्री प्रमोद करलकर, बुवा सौ अंकिता सूर्यवंशी, बुवा श्री सुरेश सावंत, बुवा श्री यशवंत परब, बुवा श्री देवेंद्र इस्वलकर, बुवा श्री सुभाष परब, बुवा श्री रमेश वाघमारे, बुवा श्री राजेंद्र भिसे, बुवा श्री संजय घाडी, बुवा श्री दीपक कोकाटे (मराठी उद्योजक),  बुवा श्री गंगाराम तळवडेकर, बुवा श्री विजय लिंगायत, बुवा श्री सुदेश कुडतरकर, बुवा श्री संदीप प्रभू, बुवा श्री नारायण गावकर, बुवा श्री सच्चिदानंद सावंत, बुवा श्री रविंद्र शिंदे, बुवा श्री राजेश मर्गज, बुवा श्री निखिल वारंग, बुवा श्री मधुरकर दळवी, तबला वादक श्री रविंद्र सावंत, कु भावेश मर्गज, श्री मोहन गावडे, पखवाज वादक कु वेदांत गावडे, कु सागर गावडे, श्री अमोल गावडे, कु सुयश कुडतरकर, श्री दत्तराज तुरी, श्री गिरीश म्हात्रे, श्री देवदत्त घोगळे, श्री नंदू परब ह्या सर्वांनी आपली कला उत्कृष्ट पद्धतीने सादर केली.त्यानंतर गुरुवर्य बुवा श्री समीर गावडे यांनी भैरवी सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.निवेदक श्री चंद्रकांत परब, श्री राजेंद्र देसाई व श्री अर्चित चव्हाण यांनी अप्रतिम निवेदन केले.तसेच कार्यक्रमासाठी श्री जयवंत पाटील, घणसोली यांची उत्कृष्ट अशी साउंड सिस्टिम लाभली होती. तसेच श्री चंद्रकांत देसाई व भिसे काका यांनी सुद्धा विशेष सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments