Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

डॉ. सुरेश भोसले यांना डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनतर्फे पुरस्कार प्रदान.

 डॉ. सुरेश भोसले  यांना डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनतर्फे  पुरस्कार प्रदान.

कराड - प्रतिनिधी.

साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी, सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने योगदान देणारे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांना डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनतर्फे ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.दूरदृष्टीचे नेतृत्व, सहकाराची बांधिलकी आणि साखर उद्योगाच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही गौरवपूर्ण दखल आहे. हा पुरस्कार त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वासोबतच कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या यशस्वी वाटचालीचा आणि शेतकऱ्यांच्या विश्वासाचा गौरव आहे.या सन्मानाबद्दल डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या नेतृत्वात साखर उद्योगाला आणि सहकार क्षेत्राला अशीच नवी दिशा व ऊर्जा मिळत राहो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.



Post a Comment

0 Comments