Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

चित्रातून जपली आदिवासी संस्कृती; अद्वैत धुळपच्या कलाकृतीने वेधले लक्ष

 चित्रातून जपली आदिवासी संस्कृती; अद्वैत धुळपच्या  कलाकृतीने वेधले लक्ष

सोलापूर : प्रतिनिधी.

 आदिवासी दिनाचे औचित्य साधून इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल, सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी कला, संस्कृती आणि निसर्ग यांचा सुरेख संगम सादर केला.या प्रदर्शनातील मास्टर अद्वैत विनायक धुळप याने साकारलेली आदिवासी स्त्री आणि निसर्ग यांच्यातील नाते दर्शविणारी भव्य चित्रकृती विशेष आकर्षण ठरली. धबधबा, हिरवाई, पारंपरिक वेशभूषा, अलंकार आणि निसर्गरम्य वातावरण यांचा सुंदर मिलाफ त्याने आपल्या चित्रातून साधला आहे. रंग, रेषा आणि भावभावनांचा प्रभावी वापर करत अद्वैतने आदिवासी जीवनशैलीला अत्यंत कलात्मक पद्धतीने कॅनव्हासवर साकारले आहे.“पुस्तकातून शिकलेली संस्कृती चित्रातून जिवंत झाली,” अशी अनुभूती ही कलाकृती पाहताना येते.या उपक्रमासाठी दिपक पाटील सर तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. मानसी जोशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना व्यक्त करण्याची तसेच भारतीय संस्कृतीशी जोडले जाण्याची प्रेरणा मिळाली.अद्वैतच्या या कलाकृतीतून आदिवासी संस्कृतीचा सन्मान, निसर्गाविषयीचे प्रेम आणि बालमनातील सर्जनशीलता यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळतो. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ चित्रकलेचे कौशल्यच नव्हे, तर भारतीय संस्कृती, परंपरा आणि निसर्गाचे महत्त्व समजण्यासही मदत होते.“कॅनव्हासवर केवळ रंग उतरले नाहीत, तर आदिवासी संस्कृतीचा आत्माच साकारला!” 

Post a Comment

0 Comments