Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

जिल्हा ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कासेगांव शिक्षण संस्थेमधील खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी

 जिल्हा ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कासेगांव शिक्षण संस्थेमधील खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी

कासेगांव - प्रतिनिधी.

 सांगली येथे दि. ०८ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या सांगली जिल्हा ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कासेगांव शिक्षण संस्थेमधील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवून पुढील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवडही मिळवली आहे.या स्पर्धेतील यशस्वी खेळाडू कु. अक्षता विजय डबाणे — भाला फेक — द्वितीय क्रमांक, कु. अनुश्री दिगंबर व्हन्माणे — थाळी फेक — द्वितीय क्रमांक,कु. मयुर गावडे — भाला फेक — द्वितीय क्रमांक उल्लेखनीय बाब म्हणजे, या सर्व खेळाडूंची डेरवण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून महाविद्यालयासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.या यशाबद्दल कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शामराव पाटील (काका), सचिव, प्राचार्य आर. डी. सावंत सर, सहसचिव जाखले साहेब, तसेच प्राचार्य डॉ. संजयकुमार मगदूम व सर्व शिक्षकवृंद यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाच्या खेळाडूंच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून भविष्यातही अशाच यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments