Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

विंग गावच्या पोलीस पाटलांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली; विद्युत वाहिनीतील बिघाड वेळेत दुरुस्त.

 विंग गावच्या पोलीस पाटलांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली; विद्युत वाहिनीतील बिघाड वेळेत दुरुस्त.

विंग (विशेष प्रतिनिधी):

विंग ता. कराड येथील दक्षता आणि प्रसंगावधनाचा प्रत्यय देत विंग गावचे पोलीस पाटील श्री. रमेश खबाले यांच्या समयसूचकतेमुळे टॉवर लाईनवरील मोठा बिघाड वेळेत उघडकीस येऊन संभाव्य धोका टळला आहे. त्यांच्या या जागरूकतेबद्दल परिसरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रमेश खबाले यांच्या घराजवळून जाणाऱ्या उच्चदाब टॉवर लाईनवर रात्री सुमारे २:३० वाजता अचानक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. सुरुवातीला एखाद्या वाहनाचा टायर फुटला असावा असा अंदाज बांधून त्यांनी परिसरात पाहणी केली; मात्र रात्रीच्या वेळी काही आढळून आले नाही. तरीही या घटनेकडे दुर्लक्ष न करता त्यांनी सकाळी पुन्हा परिसराची सखोल पाहणी केली. त्यावेळी टॉवरच्या एका बाजूची इन्सुलेटरची साखळी तुटलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ सकाळी ८:१५ वाजता महावितरण चे कर्मचारी श्री. प्रमोद मोरे यांना याविषयी माहिती दिली. श्री. मोरे यांनी सदरच्या घटनेचे गंभीर्य ओळखून mahatransco च्या वरिष्ठ लोकांना कल्पना दिली. माहिती मिळताच संबंधित विभागाने कार्यसूचकता दाखवत कार्यालयीन कामकाज प्रक्रियेनुसार कार्यवाही सुरू करून कर्मचाऱ्यांच्या समवेत  तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास टॉवर लाईन पुन्हा पूर्ववत सुरू केली.श्री.रमेश खबाले यांनी केवळ पोलीस पाटील म्हणून नव्हे, तर एक जबाबदार आणि जागरूक नागरिक म्हणून दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे वीज पुरवठ्यातील मोठा खंड आणि संभाव्य धोका टळला आहे. सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक कामांत सदैव अग्रेसर असणाऱ्या रमेश खबाले यांच्या या तत्परतेबद्दल आणि सामाजिक बांधिलकीबद्दल सर्वस्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments