Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

साळशिरंबे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती साळशिरंबे येथे उत्साहात साजरी.

विद्यार्थ्यांची भाषणे आणि खाऊ वाटपाने जयंती सोहळा संपन्न.

उंडाळे - प्रतिनिधी.

  साळशिरंबे  ता. कराड येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या सामाजिक विचारांवर अभ्यासपूर्ण भाषणे करून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. चिमुकल्यांच्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. जयंतीचे औचित्य साधून उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

या सोहळ्यास साळशिरंबे गावचे प्रगतशील शेतकरी व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन मा. प्रकाश पाटील, भाजपा बूथ प्रमुख तानाजी पवार, गोंडवाना न्यूजचे संपादक विनोद कांबळे, गोंडवाना न्यूजचे ब्युरो रिपोर्टर धनाजी साठे व सुहास साठे,जयसिंग साठे प्रवीण चोपडे, गौरव चोपडे  आणि संभाजी साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला गावातील नागरिक, महिला, युवक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments