वाटेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.
रयत क्रांती संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना फळवाटप.
कासेगाव - प्रतिनिधी.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी दोन्ही थोर नेत्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमांतर्गत रयत क्रांती संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना व उपस्थित नागरिकांना फळवाटप (केळी वाटप) करण्यात आले. सामाजिक बांधीलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाला शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख (भाऊ) यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी अण्णाभाऊ साठे आणि राजारामबापू पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी रयत क्रांती संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष उमेश कांबळे, कृष्णा आडके, अतुल माने, विकास नाडे, चेतन माने, उमेश लिंबाळकर, जावेद मुल्ला, विकास कांबळे, राजेंद्र साठे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments