Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

सुनील शिंदे यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण क्रीडा पुरस्कार जाहीर.

 सुनील शिंदे यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण क्रीडा  पुरस्कार जाहीर.

 कासेगाव- प्रतिनिधी.

कासेगाव ता. वाळवा गावचे सुपुत्र स्पीड फिटनेस जिम चे सर्वेसर्वा क्रीडा प्रशिक्षक   सुनील शिंदे यांना यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबईचा ' यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय 'क्रीडा पुरस्कार 2026 जाहीर झाला असल्याची माहिती, यशवंतराव चव्हाण फाउंडेशन  मुंबईचे अध्यक्ष संजय सावंत यांनी दिली, हा दिमाखदार पुरस्कार सोहळा 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वा. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन वाशी, या ठिकाणी आ. चित्राताई वाघ, सदस्य, विधान परिषद महाराष्ट्र शासन, नवी मुंबई महानगरपालिकेचे  विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे, या पुरस्कार सोहळ्यास ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, नवी मुंबईच्या नगरसेविका नेत्रा शिर्के, धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, माजी मंत्री आ. जयंत पाटील, सांगली जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष देवराज पाटील दादा, राष्ट्रीय पंच, गुरु मुरली वत्स सर व वैभव मोरे यांचे सुनील शिंदे यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले, यांच्यासह,पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे, आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments