Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयातील गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात  गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.


घोगाव : महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वैशाली पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समवेत शिक्षक वृंद.

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी डी. फार्म घोगाव महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावूक वातावरणात साजरी करण्यात आली. औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी आपल्या प्राध्यापक आणि मार्गदर्शकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील अध्यक्षस्थानी होत्या. मुख्य कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनांनी झाली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्यांनी  फार्मसी हे केवळ शिक्षण नसून समाजाच्या आरोग्याशी जोडलेली एक मोठी जबाबदारी आहे. एक चांगला फार्मासिस्ट घडवण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगातही गुरूंचे मार्गदर्शन आणि संस्कार विद्यार्थ्यांना योग्य दिशा देतात असे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही गुरूंच्याबद्दल प्रेम व आदर व्यक्त करणारी भाषणे केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रात उत्तम सेवा देण्यासाठी मनःपूर्वक आशीर्वाद दिले. या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व प्रा. अरुणा परीट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री नाईक व पूनम सावंत यांनी केले. 



Post a Comment

0 Comments