Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

सोलापूर विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘खेलो इंडिया संवाद’द्वारे युवा शक्तीला मार्गदर्शन

 सोलापूर विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘खेलो इंडिया संवाद’द्वारे युवा शक्तीला मार्गदर्शन

सोलापूर : प्रतिनिधी.

राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ निमित्त भारतातील विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये ‘माय भारत – खेलो इंडिया संवाद’ या राष्ट्रीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे देशभरातील युवा खेळाडू, विद्यार्थी व युवकांना मार्गदर्शन केले. त्याच अनुषंगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘खेलो इंडिया संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कर्नल प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा आणि प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रभारी संचालक डॉ. राजेंद्र वडजे होते. प्रमुख अतिथी म्हणून एनआयसीचे जिल्हा समन्वयक श्री. रवी सैनी, माय भारतचे श्री. प्रसाद खोगरे, श्री. धनराज पाटील तसेच आंतरराष्ट्रीय तिरंदाज तनिष्का ठोकळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित विद्यार्थी, युवा खेळाडू व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन मार्गदर्शनपर भाषणाचा लाभ घेतला. ‘खेलो इंडिया संवाद’च्या माध्यमातून युवकांना देशातील क्रीडा क्षेत्रातील परिवर्तन, क्रीडा परिसंस्थेची प्रगती, क्रीडा व फिटनेसचे महत्त्व तसेच भविष्यातील क्रीडा क्षेत्रातील विविध संधींबाबत मार्गदर्शन मिळाले. युवकांना क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेशी जोडणे हा या राष्ट्रीय उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.पंतप्रधानांच्या मार्गदर्शनपर संवादानंतर विद्यापीठात ‘युवा संवाद’ उपक्रम घेण्यात आला. या संवादामध्ये विद्यार्थ्यांनी नागरिकत्वाची जाणीव, कौशल्यविकास, डिजिटल व तांत्रिक कौशल्ये, स्वयंसेवा तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘माय भारत’ व्यासपीठ अधिक प्रभावी करण्याबाबत आपले विचार व सूचना मांडल्या. युवकांच्या कल्पना, अपेक्षा व आकांक्षा जाणून घेऊन त्यांची नोंद करण्याची संकल्पना या उपक्रमामध्ये होती.यावेळी ‘नशामुक्त भारत’ तसेच युवा सक्षमीकरणाच्या अनुषंगाने उपस्थित विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना शपथ देण्यात आली. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रशस्तीपत्रकांचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विनायक धुळप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्री. रवींद्र कोरे, श्री. अशोक मल्लाव तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित सावंत यांनी केले, तर प्रताप गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती, शारीरिक तंदुरुस्ती, सामाजिक बांधिलकी, स्वयंसेवा, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिर्मितीची भावना दृढ करण्यास प्रेरणा मिळाली. ‘खेलो इंडिया संवाद’च्या माध्यमातून युवा शक्तीला क्रीडा क्षेत्रासोबतच राष्ट्राच्या विकास प्रक्रियेशी जोडण्याचा संदेश विद्यापीठाच्या माध्यमातून प्रभावीपणे देण्यात आला.

Post a Comment

0 Comments