मा. संपत शेंडगे यांची जि प. शाळा, साळशिरंबे येथे सदिच्छा भेट.
उंडाळे -प्रतिनिधी.
कृगर इंडिया लिमिटेडचे जनरल मॅनेजर मा. संपत शेंडगे यांनी जिल्हा परिषद शाळा, साळशिरंबे येथे सदिच्छा भेट दिली.या भेटीदरम्यान त्यांनी शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून शाळेच्या सद्यस्थितीची व अडीअडचणींची सविस्तर माहिती घेतली.मागील ३-४ वर्षांपासून श्री.शेंडगे आपल्या कंपनीच्या माध्यमातून शाळेला विविध वस्तूंच्या रूपात मोलाची मदत करत आले आहेत. हीच दातृत्वाची परंपरा पुढे चालू ठेवत, विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य आणि काळाची गरज ओळखून त्यांनी शाळेला 'AI डिजिटल बोर्ड' (AI Digital Board) उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीवर आधारित अत्याधुनिक डिजिटल शिक्षण मिळणे शक्य होणार आहे.शाळेच्या प्रगतीसाठी सातत्याने सहकार्य करणाऱ्या मा. संपत शेंडगे व कृगर इंडिया लिमिटेडचे शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले गेले.


Post a Comment
0 Comments