उद्योजक दीपक (पंडित) कोकाटे बुवा यांचा अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाकडून भव्य सत्कार.
मुंबई :- प्रतिनिधी.
अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ (नालासोपारा, विरार, वसई शाखा) यांच्या वतीने आयोजित वर्धापन दिन सोहळा विरार येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या मंगलमयी सोहळ्यात उद्योजक श्री दीपक (पंडित) तुकाराम कोकाटे बुवा यांचा मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
सकाळपासूनच अभंग, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजराने संपूर्ण विरार परिसर भक्तिमय झाला होता. या वर्धापन दिनानिमित्त शेकडो नवोदित तसेच अनुभवी भजन गायकांनी आपल्या सुरांनी कार्यक्रमात रंग भरला.
कार्यक्रमादरम्यान मंडळाचे अध्यक्ष बुवा श्री नारायण वाळवे, पत्रकार व भजनी बुवा मंगेश तावडे, भजन सम्राट बुवा श्री मनोहर कोकाटे, याच्या हस्ते माझा शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला आणि अन्य मान्यवर... मंडळाचे अध्यक्ष विजय सावंत, उपाध्यक्ष मनोहर कोकाटे, सेक्रेटरी दादाजी नाईक यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना श्री दीपक (पंडित) कोकाटे बुवा यांनी भावना व्यक्त करताना सांगितले,"हरिनाम ज्याच्या मुखी तो सदा सुखी" हरिनामाच्या या गोडीमुळेच मला अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाची विशेष ओढ आहे... 2026 या वर्धापन दिनानिमित्त मंडळाने माझा जो सत्कार केला, त्याबद्दल मी अध्यक्ष बुवा संजय गावडे. पदाधिकारी आणि संपूर्ण मंडळाचे मनापासून लाख लाख आभार मानतो."
या सोहळ्यास परिसरातील भजनप्रेमी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला.


Post a Comment
0 Comments