Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

स्वा. दादासाहेब उंडाळकर विद्यालयास रोटरी क्लब कराडतर्फे 'इंटरॲक्टिव्ह बोर्ड' व 'सेंद्रिय खत निर्मिती किट' भेट

 स्वा. दादासाहेब उंडाळकर विद्यालयास रोटरी क्लब कराडतर्फे 'इंटरॲक्टिव्ह बोर्ड' व 'सेंद्रिय खत निर्मिती किट' भेट

उंडाळे - प्रतिनिधी.

रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीने येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयास इंटरॲक्टिव्ह बोर्ड व सेंद्रिय खत निर्मितीचे किट भेट देण्यात आले. नुकतेच रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते  विद्यालयास त्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड .आनंदराव पाटील (उंडाळकर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

  यावेळी अँड . आनंदराव पाटील म्हणाले, रोटरी क्लब कराड सातत्याने सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. यावेळी त्यांनी उंडाळ्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यालयाची निवड करून विद्यालयासाठी जे शैक्षणिक साहित्य प्रदान केले आहे त्याचा  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी पुरेपूर वापर केला जाईल.विद्यालयाच्या वतीने जे पर्यावरण पूरक उपक्रम राबवले जातात त्यासाठी त्यांनी प्रदान केलेल्या सेंद्रिय शेती किटचा उपयोग करण्यात येईल. त्यांनी विद्यालयास दिलेल्या या मदतीबद्दल विद्यालय सदैव त्यांचे ऋणी राहील. 

रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. रो. शेखर कोगनुळकर म्हणाले, उंडाळकर विद्यालयामध्ये शैक्षणिक विकासाबरोबरच विविध सामाजिक पर्यावरण विषयक उपक्रम राबवले जातात. त्या माध्यमातून समाजामध्ये निसर्ग, पर्यावरण, अंधश्रद्धा, प्रदूषण याबाबतीत सतत जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. ग्रामीण भागातील हजारावर  विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शैक्षणिक विकासाला हातभार लावण्याचे उद्देशाने रोटरी क्लब ने विद्यालयासाठी इंटरॲक्टिव्ह बोर्ड व सेंद्रिय शेती किट देऊन छोटीशी मदत केली आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी चांगला वापर होईल.

 यावेळी विद्यालयाचे प्राचार्य जगन्नाथ माळी , पर्यवेक्षिका सौ. जे. पी. पाटील , रोटरी क्लबचे अध्यक्ष,चंद्रशेखर पाटील, उपाध्यक्ष शिवराज माने, सुनील चाळके, प्रताप मोरे, आनंदा थोरात यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते धनंजय पवार यांनी प्रास्ताविक केले तर शंकर आंबवडे सर यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments