Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीला QCI मान्यता.

 

राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीला QCI मान्यता.

देशातील फार्मसी महाविद्यालयांमध्ये ८२ वा क्रमांक

कासेगाव - प्रतिनिधी.
कासेगाव शिक्षण संस्थेचे राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगावने शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, अध्यापन पद्धती, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांच्या बळावर आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया  नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने,  क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (Quality Council of India – QCI) यांच्या गुणवत्ता तपासणी (Inspection) प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाने यशस्वीरीत्या मान्यता प्राप्त केली असून, देशातील सर्व फार्मसी महाविद्यालयांमध्ये ८२ वा क्रमांक प्राप्त केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
महाविद्यालयाने अध्यापनातील गुणवत्ता, अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन संस्कृती, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, नवोपक्रम, बौद्धिक संपदा (IPR), विद्यार्थी विकास कार्यक्रम तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने उत्कृष्ट कार्य केले आहे. याच कार्याची दखल घेत QCI निरीक्षण समितीने महाविद्यालयास मान्यता प्रदान केली.
या यशामागे संस्थेचे सेक्रेटरी प्राचार्य आर. डी. सावंत आणि संस्थेच्या व्यवस्थापनाने दिलेले भक्कम सहकार्य, आवश्यक सुविधा प्रोत्साहन यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगावचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास के. मोहिते यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, प्रभावी नियोजन आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाच्या या राष्ट्रीय यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच पालकांनी आनंद व्यक्त केला असून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि समाजाभिमुख उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कार्य करून राष्ट्रीय स्तरावर आणखी उच्च स्थान मिळविण्याचा संकल्प महाविद्यालयाने व्यक्त केला आहे.
 

Post a Comment

0 Comments