Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे गिरराज त्रिपाठी यांचे व्याख्यान संपन्न

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे गिरराज त्रिपाठी यांचे व्याख्यान संपन्न

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री.संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे भारतातील फार्मासिस्टची भूमिका आणि संधी या विषयावरती गिरराज त्रिपाठी  यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ते  सन फार्मा कंपनीमध्ये सीनियर जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.यावेळी त्यांनी फार्मासिस्टची भूमिका काय असावी औषधांचे वितरण कसे करावे, रुग्ण समुपदेशक कसे करावे, आरोग्य जनजागृती कशी केली पाहिजे, औषधांची गुणवत्ता, साठवणूक व हताळणी योग्य प्रकारे कशी करावी, एखाद्या औषधांचा दुष्परिणाम झाला तर काय करावे तसेच फार्मासिस्टची कायदेशीर व नैतिक जबाबदारी काय आहे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अरुणा परीट यांनी मानले.

 

 

Post a Comment

0 Comments