लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देवराज पाटील यांच्याकडून अभिवादन.
कासेगाव - प्रतिनिधी.
सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.देवराज पाटील (दादा) यांनी आज वाटेगाव, ता. वाळवा येथे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले."अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि विचार हे आजही वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांच्या विचारांवर चालणेच खरी त्यांना आदरांजली ठरेल" अशा भावना यावेळी देवराज पाटील यांनी व्यक्त केल्या.यावेळी जिल्हा परिषद सदस्या. सौ.संध्याताई पाटील, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, माजी सभापती सौ.शुभांगी पाटील, युवा सरपंच हर्षवर्धन पाटील, वाटेगावच्या सरपंच सौ.नंदाताई चौगुले, दिनेश जाधव, भूषण चौगुले, संदीप साठे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments