Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांना डिझाईन पेटंट मंजूर

 

राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांना डिझाईन पेटंट मंजूर

कासेगाव - प्रतिनिधी.
कासेगाव शिक्षण संस्थेचे राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव येथील फार्मास्युटिकल केमिस्ट्री विभागाचे प्राध्यापक डॉ. संदीप रवींद्र काणे अंतिम वर्ष बी. फार्मसीच्या चार विद्यार्थिनींना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाईन पेटंट मंजूर झाले आहे. या संशोधनात्मक कार्यामुळे महाविद्यालयाच्या संशोधन क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.या डिझाईन पेटंटसाठी Application No. 484010-001 मंजूर करण्यात आले आहे. या संशोधन कार्यात अंतिम वर्ष बी. फार्मसीच्या कु. नेहा किरण घाडगे, कु. अमृता विजयकुमार भिलवडे, कु. संजना सचिन फाळके आणि कु. मानसी राजेश जाधव यांनी सहभाग घेतला.संस्थेचे सेक्रेटरी प्राचार्य आर. डी. सावंत व संस्थेच्या व्यवस्थापनाने संशोधन बौद्धिक संपदा निर्मितीसाठी आवश्यक ते सहकार्य प्रोत्साहन दिले. तसेच या संशोधन नवोपक्रम प्रकल्पासाठी राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगावचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास के. मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.महाविद्यालयात संशोधन, पेटंट, नवोपक्रम आणि उद्योगाभिमुख शिक्षणाला प्राधान्य दिले जात असून, या डिझाईन पेटंटमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड आणि नवकल्पनांना चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
डॉ. संदीप काणे त्यांच्या संशोधन चमूचे या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 

Post a Comment

0 Comments