राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रा. डॉ. संदीप रवींद्र काणे यांना शिवाजी विद्यापीठाची पी.एच.डी.
कासेगाव - प्रतिनिधी.(सुनील शिंदे )
कासेगाव शिक्षण संस्थेचे राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव येथील फार्मास्युटिकल केमिस्ट्री विभागाचे प्राध्यापक डॉ. संदीप रवींद्र काणे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी कॅन्सर या असाध्य रोगावरती औषध निर्माण केले आहे या संशोधन विषयावर दुसरी पीएच.डी. प्रदान केली आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील गुणवत्तेला आणखी एक मानाचा तुरा लाभला आहे. डॉ. काणे हे यापूर्वीही पीएच.डी. प्राप्त असून ही त्यांची दुसरी डॉक्टरेट पदवी आहे. या संशोधनामध्ये युफोर्बिएसी (Euphorbiaceae) कुलातील वनस्पतींचे संगणकीय (In Silico), फाइटोकेमिकल व फाइटोफार्माकोलॉजिकल पद्धतीने सखोल संशोधन करण्यात आले असून औषधनिर्मिती क्षेत्रातील नवीन नैसर्गिक जैवसक्रिय संयुगांच्या शोधाला दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.संस्थेचे सेक्रेटरी प्राचार्य आर. डी. सावंत यांनी संशोधनासाठी प्रोत्साहन दिले. तसेच या संशोधन कार्यासाठी राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगावचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास के. मोहिते यांनी मार्गदर्शक म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले.डॉ. काणे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


Post a Comment
0 Comments