कासेगाव येथे भव्य कुस्ती स्पर्धा संपन्न.
कासेगाव - प्रतिनिधी.
कासेगाव (ता. वाळवा) येथे पारंपरिक भावकाईदेवी जोगण्या यात्रेनिमित्त कुस्तीचा भव्य आखाडा पार पडला. या कुस्ती आखाड्याचे उद्घाटन यात्रा कमेटीच्या वतीने करण्यात आले.या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील (दादा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेला पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, कुस्ती स्पर्धा हे मुख्य आकर्षण ठरले.या जंगी कुस्ती स्पर्धेत करण भिडे याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तो संभाजी पैलवान पुनदी संकुलचे वस्ताद पै. सुरेकांत जाधव यांचा मल्ल आहे.दुसऱ्या क्रमांकावर ओमकार पाटोळे याने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला. तो गंगावेश तालीम, कोल्हापूर येथील खेळाडू आहे.स्पर्धेत अनेक नामांकित तसेच उदयोन्मुख पैलवानांनी सहभाग घेतला होता. कुस्तीच्या मैदानात रंगलेल्या चुरशीच्या लढतींनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. विजेत्या पैलवानांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमामुळे कासेगावच्या यात्रेला अधिकच रंगत आली असून, पारंपरिक कुस्ती संस्कृती जपली जात असल्याचे चित्र दिसून आले.


Post a Comment
0 Comments