युवा गर्जना वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी व बक्षीस वितरण समारंभ १९ जुलैला.
शिराळा - प्रतिनिधी.
युवा गर्जना-२०२६ वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी व बक्षीस वितरण समारंभ १९ जुलैला शिराळ्यातील लकी मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी
प्रमुख पाहुणे साहित्यिक व कवी श्री. नितीन चंदनशिवे, तर माजी आमदार मानसिंगराव नाईक, जि. प. सदस्य विराज नाईक, सभापती सम्राटसिंग नाईक यांची उपस्थिती असणार आहे .‘युवा गर्जना-२०२६’ या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील शिराळा येथे १९ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी कनिष्ठ गटात १० तर वरिष्ठ गटातून ५ स्पर्धकांची निवड झाली आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील यांनी दिली.ते म्हणाले, दरवर्षी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचा वाढदिवस सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम राबवून साजरा केला जातो. या वर्षी शिराळा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. ग्रामीण व डोंगराळ भागातील शाळकरी व महाविद्यालयीन मुलांचे संभाषण कौशल्य वाढावे, त्यांचे वक्तृत्वाची आवड निर्माण व्हावी, असा यामागील उद्देश आहे. स्पर्धा कोकरूड, पाडळी व चिखली येथे घेण्यात आली. त्यास स्पर्धकांनी मोठा प्रतिसाद दिला. तिन्ही ठिकाणी मुलींची उपस्थित लक्षणीय होती.
श्री. पाटील म्हणाले, स्पर्धेची अंतिम फेरी व बक्षीस वितरण समारंभ 19 जुलैला सकाळी 10.00 वाजता शिराळ्यातील लकी मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे. प्रथम कनिष्ठ व वरिष्ठ गटातील अंतिम फेरी पार पडले. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभास सुरुवात होईल. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक व श्री. नितीन चंदनशिवे आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री. मानसिंगराव नाईक आहेत. युवा नेते, जिल्हा परिषद सदस्य श्री. विराज नाईक, सभापती सम्राटसिंग नाईक प्रमुख उपस्थितीत असणार आहेत. कार्यक्रमास स्पर्धेचे परिक्षक प्रा. निता जोखे-आडके, दीपक पाटील, तानाजी सातपुते, प्रा. रेखा जाधव, प्रा. मांतेश हिरेमठ, प्रा. प्रकाश दुकळे यांच्यासह जिल्हा परिषद व सभापती, पंचायत समिती सदस्य, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर मंडळी, सर्व सहभागी स्पर्धक, युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असतील.
अंतिम स्पर्धेसाठी निवड झालेले स्पर्धक गटवार असे : कनिष्ठ गट (ज्युनिअर) : श्रेया शिवाजी कांबळे (इंगरुळ), अनुष्का अरविंद पाटील (शिराळा), आदिती सुनील पाटील (पाडळी), स्वराली शशिकांत खोत (देववाडी), वेदांती शरद खोत (देववाडी), वैष्णवी विलास पाटील (काळुंद्रे), श्रुतिका नामदेव पाटील (काळुंद्रे), शिवांश प्रमोद पाटील (पाडळेवाडी), संज्योती धोंडिराम नलवडे (पाडळी), समीक्षा विजय पवार (जांभळेवाडी).
वरिष्ठ गट (सिनिअर) :सुफिया इस्माईल नायकवडी (आरळा), अमृता चंद्रकांत शिंगटे (शिंगटेवाडी), सायली माणिक मोहिते (मांगले), पूनम दादासो सावंत (चिखलवाडी), सई राजेंद्र पाटील (रिळे). (अंतिम फेरीत सीनियर गटासाठी दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयाची निवड करून वक्तृत्व सादर करावे.)
----------


Post a Comment
0 Comments