Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल कासेगाव येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी.

 विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल कासेगाव येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी.

कासेगाव - प्रतिनिधी.

कासेगाव, (ता. वाळवा )येथील विद्यानिकेतन  इंग्लिश मिडीयम स्कूल कासेगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री आर. बी शिवाई सर व  सुपरवाइजर  जयश्री पाटील मॅडम यांच्या हस्ते झाले 

यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत दिंडी काढून "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण केले. अभंग गायन, हरिपाठ, भारूड तसेच संतांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर करण्यात आली.

यावेळी पल्लवी मॅडम यांनी आपल्या भाषणात आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक व नैतिक महत्त्व विशद केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांचा अंगीकार करून चांगले संस्कार, शिस्त आणि समाजसेवेची भावना जोपासण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन सौ. धनश्री पाटील व फलक लेखन सौ. दीपाली पाटील यांनी केले तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी  यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

Post a Comment

0 Comments