Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

कोडोली प्रशालेत 'आषाढी वारी व वृक्ष दिंडी सोहळा' उत्साहात संपन्न.

 कोडोली प्रशालेत 'आषाढी वारी व वृक्ष दिंडी सोहळा' उत्साहात संपन्न.

कार्वे - प्रतिनिधी 

 भारती विद्यापीठाचे, हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी 'आषाढी वारी आणि वृक्ष दिंडी सोहळ्याचे' अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचा शुभारंभ प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. आंबी एस. ए. सरांच्या  हस्ते पालखी पूजन  करण्यात आला. 

अभंग गायनाने दुमदुमला परिसर वारीच्या काळात विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या साथीने सुंदर अभंग गायन करून संपूर्ण वातावरण विठ्ठलमय करून सोडले.मिरवणूक आणि रिंगण सोहळा विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात आणि हातात तुळशी-वृक्षांची रोपे घेऊन कोडोली गावातून दिंडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर कोडोली ग्रामपंचायत परिसरात वैष्णवांचा डोळ्यांचे पारणे फेडणारा 'रिंगण सोहळा' पार पडला. या दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा व वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला.

​हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. कांबळे के.टी. सर,  श्री. पाटील पी.एस. सर व सौ.  जगताप एल. एम .मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संभाजी पाटील नाना,​सर्व ग्रामस्थ, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा आषाढी वारी व वृक्ष दिंडी सोहळा अत्यंत यशस्वीपणे पार पडला.




Post a Comment

0 Comments