मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूलमध्ये पारंपरिक दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.
कासेगाव - वार्ताहर (सुनील शिंदे)
मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल, कासेगाव (ता. वाळवा ) येथे आषाढी एकादशी निमित्त पारंपरिक दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत वारकरी परंपरेचे जतन करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला होता. तसेच टाळ-मृदुंगाच्या गजरात अभंग गायन करत दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात विविध संदेशपर फलक घेतले होते, ज्यातून समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला.यावेळी शाळेच्या आवारात पारंपरिक फुगडी, भजन आणि नृत्य यांचेही सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वर्तुळ करून एकत्रितपणे दिंडीचा आनंद लुटला. पालखी सजवून त्याचे पूजन करण्यात आले होते. प्राचार्या चारुशीला पाटील,शिक्षिका किशोरी जाधव, कोमल चव्हाण,प्रेरणा चव्हाण तसेच दीपाली गावडे शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने तसेच प्राचार्य चारुशीला पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि धार्मिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण झाली.


Post a Comment
0 Comments