समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालक सभा संपन्न.
शिराळा - प्रतिनिधी.
सागाव ता. शिराळा येथील हायर एज्युकेशन सोसायटी, शिराळा संचलित समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सागाव येथे इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्याची पालक सभा उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सदस्य श्री बी. एम. पाटील सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर.पी.पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री पी. बी. मोहिरे सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री डी. ए. गायकवाड सर तसेच उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री एम. एच.जाधव सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर उपमुख्याध्यापक श्री. पी. बी. मोहिरे यांनी उपस्थित मान्यवर व पालकांचे स्वागत करून सभेचे प्रास्ताविक केले. यानंतर पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. पी. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे व पालक प्रतिनिधींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यानंतर डॉ. एस. एस. गोसावी सर यांनी शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व स्पष्ट केले. त्याचसोबत इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना सीईटीचा हायर पॅटर्न या संदर्भात सूचना देऊन सीईटी चे महत्व व त्याचा अभ्यासक्रम याबद्दल माहिती दिली. यानंतर काही पालकांनी व पालक प्रतिनिधींनी आपले मनोगत व शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सदस्य श्री. बी. एम. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी विद्यालयाशी सातत्याने संपर्क ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.अध्यक्षीय मार्गदर्शनात मुख्याध्यापक श्री. आर. पी. पाटील यांनी शैक्षणिक गुणवत्ता, नियमित उपस्थिती, शिस्त, स्पर्धा परीक्षा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे आभार श्री. एम. व्ही. तिके यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. एस. बी. माने यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमास पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment
0 Comments