कासेगावमध्ये भावकाईदेवी जोगण्या उत्सव
कासेगाव : प्रतिनिधी. (सुनिल शिंदे )
कासेगाव (ता. वाळवा) येथे सालाबादप्रमाणे पारंपरिक भावकाईदेवी बारा बलुते जोगण्या उत्सव बुधवार, दि. १५ जुलै ते गुरुवार, दि. १६ जुलै या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती भावकाईदेवी यात्रा कमिटीच्यावतीने देण्यात आली.बुधवार, दि. १५ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून, दुपारी ४ वाजता जोगण्या उत्सवाची भव्य मिरवणूक निघणार आहे. गुरुवार, दि. १६ रोजी सकाळी १० वाजता लोकनाट्य तमाशा तसेच दुपारी ४ वाजता कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे.यात्रेनिमित्त कासेगाव (ता. वाळवा) येथे विविध मनोरंजनाची साधने तसेच विविध प्रकारचे पाळणे दाखल झाले आहेत.तसेच वार्षिक पारंपरिक उत्सवाचे नियोजन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments