Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

सागांवचा सुपुत्र रशियात चमकला !

 सागांवचा सुपुत्र रशियात चमकला !

MBBS चे परदेशी शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतलेल्या  सम्राटसिंह घोलपचे  जंगी स्वागत.
 

शिराळा :- प्रतिनिधी 

ग्रामीण भागातील गुणवत्ता आणि जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करत शिराळा तालुक्यातील सागांव येथील सम्राटसिंह विक्रम घोलप याने रशियामध्ये आपले वैद्यकीय (MBBS) शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. आपले परदेशी शिक्षण पूर्ण करून तो मायदेशी परतल्यानंतर सागांव ग्रामस्थांच्या वतीने आणि घोलप परिवाराकडून त्याचे अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत करण्यात आले.

सम्राटसिंह याने मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण सागांव परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तो एक आदर्श ठरला आहे.

सम्राटसिंहचा शिक्षण प्रवास अतिशय प्रेरणेचा आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा, सागांव (इयत्ता १ ली ते ४ थी) येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण समाज विकास उच्च माध्यमिक विद्यालय, सागांव (इयत्ता ५ वी ते ९ वी) आणि न्यू इंग्लिश स्कूल, वारणानगरी, मणदूर येथे इयत्ता ९ वी व १० वीचे शिक्षण त्याने पूर्ण केले. पुढील उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्याने कराड येथील कॉलेज मधून ११ वी आणि १२ वी सायन्स पूर्ण केले.

उच्च माध्यमिक शिक्षणानंतर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्याने थेट रशिया गाठले. रशिया देशात MBBS चे शिक्षण घेत असताना त्याने पहिल्याच वर्षी 'टॉप १' (Rank 1) क्रमांक पटकावून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली होती. सर्व वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून तो आता डॉक्टर बनून मायदेशी परतला आहे.मायदेशी परतल्यानंतर सम्राटसिंह याचे त्याचे वडील विक्रम घोलप, आजी शारदा घोलप, आई मनीषा घोलप, चुलते धनाजी घोलप, चुलती शितल घोलप, भाऊ उदयसिंह घोलप, बहीण हर्षदा घोलप आणि भाऊ श्रीतेज घोलप या सर्व कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने, औक्षण करून आणि पुष्पगुच्छ देऊन अत्यंत भावुक व उत्साही वातावरणात स्वागत केले.ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील मुलाने परदेशात जाऊन, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश सागांव आणि शिराळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे. आगामी काळात तो आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments