Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

स्व.राजाराम सातपुते यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण.

 स्मृतिदिनानिमित्त "एक व्यक्ती - एक झाड" उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

स्व. राजाराम  सातपुते  यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण .

शिराळा - प्रतिनिधी.

स्व. राजाराम बळी सातपुते (आबा)रेड, ता.शिराळा   यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बाबासो कांबळे व प्रथमेश सातपुते यांच्या कल्पनेतून व पुढाकाराने "एक व्यक्ती - एक झाड" हा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

"आबांची शेवटची इच्छा होती  माझ्या नावाने झाड लावा"हीच भावना घेऊन संपूर्ण रेड गाव एकत्र आले. शेकडो ग्रामस्थांचा सहभाग या उपक्रमात होता यात ज्येष्ठ नागरिक , महिला, युवक, शाळकरी मुले उपस्थित होती.

आबांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शेकडो विविध वृक्षांची लागवड केली.प्रत्येकाला वृक्षरोप भेट देऊन  "पर्यावरण जपूया" हा  संदेश या उपक्रमाद्वारे देण्यात आला.स्मृतिदिनाचा विधी बौद्धाचार्य शशिकांत कांबळे यांनी बौद्ध पद्धतीने पार पाडला . यावेळी सांगली जिल्हा भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष संभाजी भिसाळे, जिल्हा सरचिटणीस गौतम कांबळे, सुरेश कांबळे, शिराळा तालुका अध्यक्ष जगन्नाथ परूळे, समता सैनिक दल मुंबई पोलिस अरुण सातपुते, सुयोग सातपुते, विकी सातपुते, रवी सातपुते, प्रशांत सातपुते, प्रविण सातपुते, आनंदा सातपुते, तेजेश सातपुते, रमेश मोहिते, बाळासो कांबळे, अमोल कांबळे, पोपट कांबळे, प्रतिक सातपुते,  विकास सातपुते,  शांताराम सातपुते,तुषार झुमुर करमाळे, नामदेव झुमूर,बाजीराव सातपुते  व इतर नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"असे उपक्रमच गावाला एकत्र आणतात. सातपुते-कांबळे परिवाराचे कौतुक." असे मत ग्रामपंचायत सदस्य मा. अरविंद सातपुते यांनी यावेळी व्यक्त केले.

"आबांनी आयुष्यभर गावासाठी कष्ट केले. आज 100 झाडे लावून खरी श्रद्धांजली दिली. ही झाडे म्हणजेच आबा आहेत." असं  मत सामाजिक कार्यकर्तेबाबासो कांबळे यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी "आबांच्या नावाने रेङ हिरवे करू"   अशी शपथ घेतली.

"ही सुरुवात आहे. पुढच्या वर्षी 200 झाडे लावू."प्रथमेश सातपुते यांनी अभिवचन दिले.



Post a Comment

0 Comments